नांदेपेरा येथील प्लॅस्टिक कारखान्याने ग्रामस्थ त्रस्त!
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील प्लॅस्टिक कारखान्यातील निघणारा प्रदूषित कचरा गावात सर्वदूर पसरत असल्याने ग्रामस्थांना व जनावरांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. परिणामी संबंधित कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच, सचिव यांचेकडे निवेदन सादर करीत केली आहे.
.jpg)
वणी पासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदेपेरा ग्रामपंचायत ने गावा लगतच एका प्लॅस्टिक कारखान्याला ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे.
सदर प्लॅस्टिक कारखान्यात प्रदूषण नियामक मंडळाचे कोणतेही नियम न पाळता गावात प्रदूषित वातावरण निर्माण केले आहे. कारखान्यातील प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट न लावता , जागोजागी प्लॅस्टिक कचरा पडला आहे. परिणामी गावातील ग्रामस्थांचे,जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्लास्टिक है मानव, प्राणी, व पर्यावरणाला नुकसान पोहचवीत असल्याने संपूर्ण जगात प्लास्टिक वापरावर निर्बंध घातले आहेत. आपल्या देशात मुद्धा २० मायक्रान पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक चा वापरावर बंदी घातली आहे, परंतु आपल्या गावात ग्रामपंचायतीने ह्या प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यास ना हरकत प्रमाणपत्र देऊन गावात मानवी, प्राणी, व पर्यावरणास नुकसान करणाऱ्या व्यवस्थेला जन्म दिला आहे.
ह्या कारखान्याचा जूना कचरा ठिकठिकाणी पडला असून ह्या पासून गावातील मुक्या जनावरांना, शेतीला व मानवाचा जीवितास हानी पोहचत असताना ह्याकडे ग्रामपंचायतीने डोळेझाक करून त्या कचऱ्याची विल्हेवाट त लावता तसेच निर्माण होणान्या प्राणघातक प्लॅस्टिक कचऱ्याचे योग्य नियोजन न करता सदर कारखान्याला परवानगी देणे हे गावकत्यांच्या हिताचा विरोधात असून ह्या संदर्भात ग्रामपंचायतीने ताबडतोब पावले उचलत कार्यवाही केली पाहिजे. तसेच सदर कारखाना गावात लावू की नये याबाबत ग्रामसभेत निर्णय घ्यावा, अशी ह्या निवेदनाद्वारे मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा!
सदर प्लास्टिक कारखान्याच्या प्रदूषित धोरणाकडे ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रकाश चिकटे, चंद्रज्योती शेंडे, सुरेश शेंडे,,राजू डोंगे, नीलकंठ डोंगे, शंकर ठोंबरे, एकनाथ मेश्राम, विनोद डोंगे सह असंख्य ग्रामस्थांनी स्वाक्षरी करीत सरपंच,सचिव, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला दिला आहे.
